तामिळनाडू किनारपट्टीला निलम वादळाचा धोका

October 30, 2012 11:09 AM0 commentsViews: 97

30 ऑक्टोबर

अमेरिकेबरोबर आता भारतालाही चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला निलम वादळ धडकण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं चक्रीवादळचा इशारा दिलाय. उद्या दुपार किंवा संध्याकाळपर्यत हे वादळ भारताच्या किमारपट्टीवर धडकू शकतं. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळा, कॉलेजना सुट्टी देण्यात आली आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. किनार्‍या लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून सुरक्षित स्थळी हलवण्याची उपयोजना आखली जात आहे.

close