मेट्रोच्या कंत्राटदारांकडून दंड वसुली सुरु

November 1, 2012 3:27 PM0 commentsViews: 3

01 नोव्हेंबर

मुंबईमधल्या मेट्रो आणि मोनोरेल अपघात प्रकरणांमध्ये कंत्राटदारांकडून दंड वसूल करा, असे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. यानुसार, एमएमआरडीएनं दंड वसुलीला सुरुवात केली आहे. अंधेरीतल्या मेट्रो अपघात प्रकरणी कंत्राटदाराला 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय तर जे. पी. रोड पूल अपघात प्रकरणी कंत्राटदाराला 10 लाख दंड आहे. तर असल्फामध्ये शाळकरी मुलांचा खड्‌ड्यातल्या पाण्यात पडून मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदाराला 10 लाख दंड सुनावण्यात आला आहे. याप्रमाणे आणखी अपघातग्रस्तांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.

close