मग माझ्यासोबत वडरांची पण चौकशी करा -गडकरी

October 31, 2012 3:09 PM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर

केजरीवाल आणि त्यांच्या टीमने केले आरोप खोटे असून आपल्याला बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत, पण काँग्रेसने रॉबर्ट वडरा यांची चौकशी करणार का असं आव्हानही गडकरींनी काँग्रेसला दिलंय.भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी शक्तिप्रदर्शनाचा धडाका लावलाय. नागपूर पाठोपाठ गडकरींनी आज मुंबईतही शक्तिप्रदर्शन केलं. नितीन गडकरींच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळावर मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी ते कार्यकर्त्यांशी बोलत होते.

close