अमेरिकेला सॅन्डी चक्रीवादळाचा फटका ; 16 जणांचा मृत्यू

October 30, 2012 11:18 AM0 commentsViews: 7

30 ऑक्टोबर

अमेरिकेला सँडी चक्रीवादळाने अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला जोरदार तडाखा दिलाय.त्यात अमेरिकेतल्या 16 तर कॅनडातल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी न्यूयॉर्क, लाँग आयलंड, न्यूजर्सी येथे राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. वादळामुळे 13 राज्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर आलाय. वीजपुरवठा खंडीत झाल्यानं तेरा राज्यं अंधारात बुडाली आहे. वादळाचा धोका आता जरा कमी झालाय पण त्यामुळे लाखो लेाक मात्र विस्थापित झाले आहे. न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार 60 लाख लोक वीजेपासून वंचित आहेत. 13 हजारांहून जास्त फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली. गेल्या 27 वर्षंामध्ये पहिल्यंादाच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज सलग दुसर्‍या दिवशीही बंद राहिला.

close