भारताविरुद्ध मालिकेसाठी इंग्लंड टीम भारतात दाखल

October 29, 2012 11:36 AM0 commentsViews: 2

29 ऑक्टोबर

भारताविरुद्ध नोव्हेंबरमध्ये होणार्‍या टेस्ट सीरिजसाठी इंग्लंडची टीम भारतात दाखल झाली आहे. भारत दौर्‍यात इंग्लंडची टीम 4 टेस्ट मॅच, टी-20 आणि पाच वन डे सीरिज खेळणार आहे. यातली पहिली टेस्ट मॅच 15 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळवली जाईल. त्याआधी इंग्लंडची टीम 3 प्रॅक्टिस मॅचही खेळणार आहे. इंग्लंडचा वादग्रस्त बॅट्समन केविन पीटरसनचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. भारत दौर्‍यात इंग्लंडचं लक्ष असेल टेस्टमध्ये नंबर वन स्थान पटकावण्याचा. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 2 टेस्टमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं इंग्लंड टीमला नंबर वनचं पद गमवावं लागलं होतं.

close