अन्न धान्य वितरण कार्यालयातील 2 लाचखोर क्लार्क अटकेत

November 1, 2012 3:51 PM0 commentsViews: 13

01 नोव्हेंबर

पुणे ऍन्टी करप्शन विभागाने अन्न धान्य वितरण कार्यालयातल्या दोन लाचखोर क्लार्कना अटक केली. अमितोष पत्की याला पन्नास हजार रूपयाची लाच घेताना तर अंबादास चव्हाण याला दहा हजार रूपयाची लाच घेताना ऍन्टी करप्शन विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. स्वस्त धान्य दूकानाचा परवाना आदेश काढण्याकरिता अमितोष पत्की आणि अंबादास चव्हाण यांनी तक्ररदार प्रमोद सोलंकीकडे लाचेची मागणी केली होती. यातील अंबादास चव्हाण याच्या घरी ऍन्टी करप्शन विभागाने झडती घेतली असता त्याच्याकडे 66 लाख रूपायाची संपती असल्याचे उघड झाले आहे. कोर्टानी या दोन्ही लाचखोर कर्मचार्‍यांना 3 तारखेपंर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close