‘केजरीवालांचे आरोप बिनबुडाचे’

October 31, 2012 3:19 PM0 commentsViews: 2

31 ऑक्टोबर

अरविंद केजरीवाल यांनी केले आरोप धांदाट खोटे आहे. त्यात काहीच ठोस नाही. त्यामुळे आम्ही ते नाकारतो. हितसंबंध असलेल्या लोकांच्या वतीने त्यांनी असे बेजबाबदार आरोप केले आहे. अशाप्रकारच्या प्रकल्पांमधली गुंतागुंत समजून न घेता हे आरोप करणे चुकीचं आहे. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्याचीही गरज नाही असं स्पष्टीकरण रिलायन्सने दिलंय. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज मुकेश अंबानी यांच्यावर आरोप केले. रिलायन्सने तेल आणि गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट घेऊन मनमानी कारभार केला. मनाप्रमाणे दर लावून सरकारच्या तिजोरीतून लूट केली यासाठी एनडीए सरकार आणि यूपीए सरकारला खिशात घातले. या लुटालुटीमुळे देशाचे 45 हजार कोटींचे नुकसान झाले आहे असे आरोप अरविंद केजरीवाल यांनी केले.

close