गृहमंत्रीपदासाठी भुजबळांच्या नावाची चर्चा

December 2, 2008 7:28 AM0 commentsViews:

2 डिसेंबर, मुंबई आर आर पाटील यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधीमंडळ नेतेपदाच्या निवडीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक नरिमन पाँईट इथल्या पक्ष कार्यालयात पार पडली. या बैठकीत विधीमंडळ नेता निवडीचे सर्वधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला. दरम्यान, गृहमंत्री पदासाठी बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेतून धडाकेबाज कारकीर्द सुरू केलेल्या भुजबळ यांनी अनेक राजकीय चढ उतार पाहिलेत. शिवसेनेतून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर निष्ठा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. छगन भुजबळ यांनी याआधीही गृह मंत्रीपद सांभाळलंय. गृहमंत्री असतानाच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अटक करण्याचं धाडस दाखवलं होतं. भुजबळांची वादळी कारकीर्द तेलगी प्रकरणामुळे काहीशी झाकोळली गेली होती. मात्र यातून ते बाहेर आले आणि आता ओबीसींचा राष्ट्रीय नेता म्हणून ते पुढे येत आहेत.

close