ऊस दरवाढ प्रश्नी ‘स्वाभिमानी’-राष्ट्रवादीत वाद पेटला

October 30, 2012 11:32 AM0 commentsViews: 16

30 ऑक्टोबर

ऊस दराचा वाद आता चांगलाच पेटलाय. स्वाभिमानी शेतकरी संघटना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू झालाय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक होतं कागल तालुक्यात उस वाहतूक रोखली आहे. कार्यकर्त्यांनी वीस बैलगाड्यांचे टायर फोडलेत.तर शाहू साखर कारखान्याकडे जाणारा ऊस रोखून धरला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरले आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला रा़ष्ट्रवादी काँग्रेसनं विरोध केलाय. काल कुरुंदवाड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं. यावेळी शेट्टी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. कुरुंदवाड नगरपालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आलं. नुकताच झालेल्या 11 व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी शरद पवारांसह अजितादादांवरही टीका केली होती. हीच टीका सहन न झाल्यानं आता राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वाभिमानीला जोरदार प्रत्युत्तर देण्याचं ठरवलंय. त्यामुळं जिल्ह्यातलं ऊस दरवाढीचं आंदोलन पेटण्याची शक्यताय.

close