सुनील तटकरेंसह कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी

November 1, 2012 3:54 PM0 commentsViews: 3

01 नोव्हेंबर

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांची ईडीनं प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. सिंचन घोटाळा आणि अवैध संपत्ती जमवल्याचा सुनील तटकरे यांच्यावर आरोप आहे. ऍण्टीकरप्शन विभागानं अशी चौकशी करण्याबाबत ईडीला विनंती केली होती तसेच त्यांना तटकरेंसंबधातली कागदपत्रही दिली होती. त्याचा आधार घेऊनच ईडी चौकशी करत आहे. सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 140 कंपन्या स्थापन करून बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता.

close