‘नीलम’ चक्रीवादळाचा तडाखा

October 31, 2012 4:32 PM0 commentsViews: 30

31 ऑक्टोबर

अमेरिकेत सँडी वादळानंतर भारतातही नीलम चक्रीवादळ आज तामिळनाडू किनारपट्टीवर धडकलं. त्यात दक्षिण चेन्नईत एका व्यक्तीचा वाहून जाऊन मृत्यू झाला. तर व्यापारी जहाजातले 5 जण बेपत्ता झाले आहे. हे चक्रीवादळ ताशी 100 किलोमीटर वेगानं पुढे सरकरतं आहे. याची तीव्रता आणखी वाढण्याची भीती असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. जोरदार वारे आणि पावसाची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केलीय. महाबलीपुरममध्ये आज हे वादळ पहिल्यांदा धडकलं. तिथल्या जवळपास साडेतीन हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. लोकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहे. पुदुच्चेरी तसंच आंध्रप्रदेशमधल्या किनारपट्टीवरच्या पाच जिल्ह्यांमध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.

close