भारत-पाक सीरिजला गृहमंत्रालयाचा हिरवा कंदील

October 30, 2012 11:52 AM0 commentsViews: 6

30 ऑक्टोबर

मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल पाच वर्षानंतर पाकिस्तानची टीम भारतभुमीवर खेळणार आहे. आज गृहमंत्रलयानं भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरिजला हिरवा कंदील दाखवला असून 22 डिसेंबरला पाकिस्तानची टीम भारत दौर्‍यावर येणार आहे. आणि 25 डिसेंबरला भारत-पाक दरम्यान पहिली मॅच खेळवली जाणार आहे. चेन्नई, दिल्ली, बंगळुरु, कोलकाता आणि अहमदाबादमध्ये पाच वन डे मॅच खेळवल्या जातील.

सध्या इंग्लंडची टीम भारत दौर्‍यावर आहे. पण ख्रिसमसच्या सुट्टीत इंग्लंड टीम मायदेशी परतणार असल्यानं या मधल्या काळात भारत-पाक दरम्यान वन डे सीरिज खेळवली जाईल. जुलै महिन्यात बीसीसीआयच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत भारत-पाक सामन्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या सामन्यामुळे तब्बल पाच वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संबंध जुळून येथील अशी आशा कमिटीला आहे. पण देशातील प्रमुख पक्षांनी याला कडाडून विरोध केला आहे. शिवसेनेनं पाक टीमला मुंबईत पाय ठेवू देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. राज्यातील इतर पक्षांनीही याला विरोध केला आहे. दहशतवादाला पाठिंबा करण्यार्‍या देशाशी क्रिकेट सामना खेळवू नये अशी मागणी भारीपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. आता गृहमंत्र्यांनी हिरवा झेंडा दिल्यामुळे आता 'क्रिकेटयुद्ध' रंगणार आहे.

close