बोगस खताचा कारखाना पोलिसांनी केला उद्धवस्त

October 29, 2012 12:38 PM0 commentsViews: 56

29 ऑक्टोबर

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चितोडा गाव शिवारातील एका जंगलात बोगस सेंद्रिय खत बनविण्याच्या कारखाना पोलिसांनी उद्धस्त केला आहे. या कारवाईत 350 सेंद्रीय खताच्या बॅग जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतलंय. राज्य सरकारकडून कृषीविभागमार्फत विशेष योजनेअर्तगत दिल्या जाणार्‍या खतांचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केलाय. या खतांच्या बॅगमध्ये खतांऐवजी कोळशाची राख भरलेली दिसून आली आहे. तर हे बोगस खत निर्माण करणारे हे रॅकेट संपूर्ण विदर्भासहराज्यभर पसरलेली असल्याची शक्यतेवर पोलीस तपास करत आहेत.

close