चिदंबरमांच्या मुलाविरुद्ध ट्विट करणार्‍याला अटक आणि जामीन

November 1, 2012 3:59 PM0 commentsViews: 3

01 नोव्हेंबर

केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या मुलाविरुद्ध ट्विट केलं म्हणून एका व्यक्तीला अटक करुन जामिनावर सुटका करण्यात आली आहे. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांनी आपल्याविरोधात रवी श्रीनिवासन या व्यक्तीनं आक्षेपार्ह ट्विट केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रवी श्रीनिवासन याला अटक करण्यात आली होती. नंतर रवी श्रीनिवासन याची जामिनावर सुटका करण्यात आली. रवीनं आपल्याविरुद्ध 2011 मध्ये तीनवेळा आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप कार्ती यांनी केलाय.

close