गडकरींच्या ‘पूर्ती’मधील कंपन्यांची आयकर विभागाकडून चौकशी

October 30, 2012 12:09 PM0 commentsViews: 4

30 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पूर्ती ग्रुपमध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्यांची इन्कमटॅक्स विभाग चौकशी करतं आहे. कंपन्या काम करतात का ? संचालक कोण आहेत ? त्यांचे पत्ते खरी आहेत का? याची माहिती घेतली जातेय. मुंबईत 12 ठिकाणी चौकशी सुरु आहे. सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात पूर्ती ग्रुपमध्ये बेनामी कंपन्यांची नाव असल्याची माहिती समोर आली आता त्या कंपन्यांची माहिती गोळा केली जात आहे. मुंबईतील मालाड, अंधेरी,भांडूप आणि विद्याविहारसह इतर 12 ठिकाणी चौकशी सुरू आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकार्‍यांनी पूर्ती ग्रुपच्या हेडक्वार्टर्सचीही चौकशीचे संकेत दिले आहे.

close