माणिकराव ठाकरे पाठवणार गडकरींना कायदेशीर नोटीस

October 30, 2012 1:24 PM0 commentsViews: 5

30 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी विरूद्ध काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरुच आहेत. आधीच पूर्ती कंपनीतल्या घोळामुळे अडचणीत आलेल्या गडकरींवर माणिकराव ठाकरे यांनी नवे आरोप केले आहेत. गडकरी नैराश्यातून आपल्यावर टीका करत आहे. एका राष्ट्रीय अध्यक्षाला हे शोभनिय नाही. गडकरींनी केलेले आरोप खोटे आहे आता या प्रकरणी आपण त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलं तसेच गडकरींनी चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका गावातल्या अरुणी उपसा सिंचन प्रकल्पात 23 शेतकर्‍यांना जमीन द्यायला सांगून ती जमीन जिल्हा बँककडे गहाण ठेवली. त्या शेतकर्‍यांशी करार केला आणि जिल्हा बँकेने त्यांना कर्ज दिलं.यात शेतकर्‍यांचे सातबारा गहाण ठेऊन 35 लाखांचं कर्ज दिलं. दुसर्‍या एका प्रकल्पात 26 लाखांचं कर्ज घेतलं आणि तिथून गडकरींनी पोबारा केला असा गंभीर आरोप माणिकराव ठाकरे यांनी केलाय.

close