सिलिंडरवरून आघाडीत रस्सीखेच;राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा

November 2, 2012 10:17 AM0 commentsViews: 4

02 नोव्हेंबर

राज्यात 6 ऐवजी 9 सिलिंडर देण्यावरून आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीत राजकीय रस्सीखेच सुरु झाली आहे. राज्यात 6 ऐवजी 9 सिलेंडर सबसिडीनं द्यावेत नाहीतर आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलाय. काँग्रेसध्यक्षा सोनिया गांधींनी आदेश देऊनही अजून राज्यात हा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसंच राष्ट्रवादीचा याला विरोध नसल्याचं खुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता जनतेच्या फायद्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल असा इशारा पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अर्थखाते राष्ट्रवादीकडेच असून 3 सिलिंडर्सची सवलत सर्व ग्राहकांना द्यायची असेल तर राज्याच्या तिजोरीवर 2400 कोटींचा बोजा पडणार आहे, असं राष्ट्रवादीकडे असलेल्या अर्थखात्यानं स्पष्ट केलंय. त्यामुळे एकीकडे राष्ट्रवादीचे नेते बोजा पडणार असल्याचं कारण पुढे करून सवलतीला मंजूर देऊ शकत नाही दुसरीकडे राष्ट्रवादीचेच नेते रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहे.

close