माझ्या स्वातंत्र्यावर गदा आल्यानं स्वेच्छानिवृती घेतोय -पांढरे

November 1, 2012 10:08 AM0 commentsViews: 7

01 नोव्हेंबर

माझ्या स्वातंत्र्यावर गदा आल्यानं स्वेच्छानिवृती घेत असल्याचा गौप्यस्फोट मेरीचे चीफ इंजिनिअर विजर पांढरे यांनी केला. आपल्यावर थेट दबाव नाही. पण आपल्यावर आणि आपल्या कामावर सतत लक्ष ठेवलं जात असल्याचं पांढरे यांनी म्हटलंय. पांढरे यांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मेरीच्या महासंचालकामार्फत राज्याच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यात आलाय. सिंचनाची श्वेतपत्रिका काढूनही फारसं काही हाती लागणार नाही, असंही पांढरे यांनी म्हटलंय. विजय पांढरे यांनी सिंचन घोटाळ्याचा पर्दाफाश केल्यामुळे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. पांढरे यांनी सिंचन घोटाळ्यासंबंध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राज्यपालांना एक पत्र लिहले होते. मात्र पांढरे एकीकडे आरोप करत असताना त्यांनाच मनोरूग्ण ठरवलं जातं होतं. मात्र पांढरे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. मी जर मनोरूग्ण होतो तर मला बढती का दिली ? असा सवाल उपस्थित करून टीकाकारांना उत्तर दिले होते.

close