100 टक्के गुन्हेगार राष्ट्रवादीत सापडतील – माणिकराव ठाकरे

November 2, 2012 10:29 AM0 commentsViews: 10

02 नोव्हेंबर

सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जोरदार शाब्दिक चकमकी सुरू आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केलाय. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये गुन्हेगार कोणत्या पक्षात जास्त आहे असा टीव्हीवर सर्व्हे केला तर लोक 100 टक्के मते जास्त गुन्हेगार राष्ट्रवादीमध्ये आहेत असे देतील अशी टीका माणिकराव ठाकरे यांनी वाडा येथे नगरपरिषदेच्या प्रचारादरम्यान केली आहे. दरम्यान रिटेल क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या वतीने 19 लाख शेतकर्‍यांच्या सह्या असलेली पत्रं दिल्लीला पाठवण्यात आली आहे. पत्रंाच्या ट्रकला प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत हिरवा झेंडा दाखवला.

close