बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

November 3, 2012 11:07 AM0 commentsViews: 12

03 नोव्हेंबर

पवईत फिल्डरपाडा येथे राहणार्‍या सितबाई पागे (वय 55) यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. सिताबाई पागे या घराबाहेर बाहेर पडल्या असता घराजवळच्या झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने हल्ला चढवला. काही काळ त्यांनी त्याचा प्रतिकार केला. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला पण रात्रीच्या काळोखात कोणी मदतीला येऊ शकलं नाही. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. पोलीस आणि वनअधिकार्‍यांनी रात्रभर परिसरात शोधाशोध केला. यापुर्वीही जुलै महिन्यात संजना थोरात या सात वर्षाच्या मुलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

close