नगरमध्ये नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

November 2, 2012 11:51 AM0 commentsViews: 7

02 नोव्हेंबर

अहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये बिबट्याची प्रचंड भिती पसरली आहे. अखेर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागानं दिले आहे. बिबट्याचे हल्ले झालेल्या अनेक ठिकाणी वनविभागानं पिंजरे लावलेत, मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश आलेलं नाही. गेल्या 15 दिवसात या बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा बळी गेलाय तर दोन तरुण जखमी झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी 5 रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्यात, मात्र अद्याप बिबट्याचा सुगावा वनविभागाला लागत नाही.

close