मुंबई हल्ल्यातील शहिदांना जळगावमध्ये श्रध्दांजली

December 2, 2008 7:01 AM0 commentsViews: 1

2 डिसेंबर जळगावमुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्यांत शहीद झालेल्या पोलिसांना जळगावमध्ये श्रध्दांजली वाहण्यांत आली.शहरातल्या 51 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जिल्हा पोलीस आवारातल्या शहीद स्मारकाजवळ लहानथोरांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती.मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यांत बळी पडलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी यांसह मेजर संदीप यांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली. शाळकरी मुलांसह शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, पोलीस दल, जेष्ठ नागरिक आदींचा सहभाग या कार्यक्रमांत होता. शांती,सद्भावना आणि एकात्मतेची शपथ या कार्यक्रमांत उपस्थितांनी घेतली.पद्मश्री भंवरलाल जैन यांसह उपस्थितांनी शहीद स्मारकांस पुष्पचक्र अर्पण केलं.जागरुक नागरिक मंचनं याप्रसंगी शहीद मदत सेवा निधी संकलन करण्याचं जाहीर केलं.

close