आयुक्तांविरुद्ध सरनाईकांचा 100 कोटींचा मानहानीचा दावा

October 30, 2012 4:22 PM0 commentsViews: 2

30 ऑक्टोबर

ठाण्यात महापालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यातील वाद आता जोरात पेटलाय. आयुक्त आर. ए. राजीव यांच्याविरुद्ध मानहानीचा आरोप करुन 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा निर्णय आमदार सरनाईक यांनी घेतला आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विहंग कंपनीनं पाणी चोरलं असा आरोप करुन आयुक्त आर ए राजीव यांनी गुन्हा दाखल केलाय. विहंग ग्रुप हा आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचा असल्यानं ही कारवाई राजकीय आकसापोटी केल्याचा आरोप सरनाईक यांनी केलाय. दरम्यान सरनाईक यांनी पाणी चोरीचा आरोप फेटाळला असून आयुक्तानी मानहानी केल्यानं त्यांच्याविरुध्द 100 कोटीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आयुक्तांनी मात्र ही कारवाई कायदेशीर असून कायद्याप्रमाणंच उत्तर देईन असा पवित्रा घेतला आहे.

close