86 व्या अ.भा.संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.नागनाथ कोतापल्ले

November 1, 2012 12:07 PM0 commentsViews: 111

01 नोव्हेंबर

चिपळूण येथे होणार्‍या 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ समिक्षक आणि लेखक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी निवड करण्यात आली आहे. कोतापल्ले यांना सर्वाधिका 584 मतं मिळाली त्यामुळे त्यांचा निर्विवाद विजय झाला. बहुमतासाठी 445 मतांची आवश्यकता होता. यासाठी साहित्य संघाच्या 1064 जणांनी मतदान केलं. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी नागनाथ कोतापल्ले यांच्या विरोधात शिरीष गोपाळ देशपांडे, अशोक बागवे आणि ह. मो. मराठे हे प्रख्यात साहित्यीक उमेदवार होते. पण यापैकी ह.मो.मराठे यांनी 164 मतंच मिळाली. डॉ.नागनाथ कोतापल्ले यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांची व्यासंगी साहित्यिक अशी ओळख आहे. त्यांनी अनेक लघुकथा, कादंबरी, कविता अशा अनेक साहित्यप्रकारांत उत्कृष्ट लेखन केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरूपदही भुषवलं आहे. त्यांच्या विजयामुळे साहित्यानी त्यांचं अभिनंदन केलंय.

close