नाशिक कारागृहामध्ये गँगवॉरातून एकाची हत्या

November 2, 2012 12:06 PM0 commentsViews: 7

02 नोव्हेंबर

नाशिक रोड सेंट्रल जेलमधल्या गँगवॉरमधून शिर्डीत एकाची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे जेलमधलं हे गँगवॉर रोखण्यात प्रशासनाला अपयश आल्याचं स्पष्ट झालंय. सध्या जेलमध्ये शिर्डीच्या शेख आणि भूषण मोरे या दोन गँगचे गुंड आहेत. या दोन्ही गँगच्या गुंडांची बुधवारी जेलमध्येच हाणामारी झाली. या हाणामारीचे पडसाद जेलबाहेर शिर्डीतल्या कालिकानगरमध्ये उमटले . तिथे मोरे गँगच्या गुंडांनी शेख आणि त्याच्या गँगमधल्या सागर काळेच्या घरावरही हल्ला केला. पण या हाणामारीत सागरचे वडील शिवाजी काळे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी 5 जणांना अटक केली आहे तर 15 जण फरार आहेत.

close