सतीश शेट्टी हत्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही :आयआरबी

November 3, 2012 2:32 PM0 commentsViews: 5

03 नोव्हेंबर

आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही असा दावा आयआरबीनं केला आहे. सीबीआयच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याची तयारी आयआरबीनं दाखवली आहे. आयआरबीच्या पुण्यातल्या ऑफिसेसवर सीबीआयनं शुक्रवारी छापे टाकले. सतीश शेट्टी यांच्या हत्याप्रकरणात सीबीआयनं तपास हातात घेतल्यानंतर ही कारवाई झाली. पुण्यातल्या 4 ऑफिसेसवर हे छापे टाकण्यात आलेत. 13 जानेवारी 2010 रोजी सतीश शेट्टी यांची तळेगाव-दाभाडे गावात हत्या झाली होती. त्यापूर्वी आयआरबी आणि त्याच्या सहकंपन्यांनी सरकारी भूखंड हडपण्यासाठी बनावट कागदपत्रं तयार केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. शेट्टी यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहून भूखंड घोटाळ्याची तक्रार दाखल केली होती.

close