विलासरावांना घेरलंय प्रोटोकॉलच्या वादळानं

December 2, 2008 4:12 AM0 commentsViews:

2 डिसेंबर मुंबईआशिष जाधवमुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आता नवा वाद निर्माण केला आहे. राष्ट्रपतींसोबत असताना मुख्यमंत्री प्रोटोकॉल विसरले. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी जे.जे हॉस्पिटलला भेट देऊन मुंबई हल्ल्यातल्या जखमींची विचारपूस केली. यावेळी राष्ट्रपतींच्याबरोबर राज्यपाल एस.सी. जमीर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख्य आणि ज्येष्ठ मंत्री होते. रुग्णांची विचारपूस केल्यानंतर विलासराव हॉस्पिटलमधून बाहेर पडले. राष्ट्रपतींना निरोप देण्याआधीच ते आपल्या गाडीत जाऊन बसले. त्यांच्या पाठोपाठ प्रतिभाताई पाटील बाहेर आल्या, त्यांना इतर मंत्र्यांनी निरोप दिला. पण विलासराव मात्र आपल्या गाडीतच बसून राहिले. राजीनाम्याच्या चिंतेनं ग्रस्त असलेल्या विलासरावांना प्रोटोकॉल नावाच्या वादळानं पुन्हा एकदा घेरलं. राजीनाम्याच्या टांगत्या तलवारीमुळे मुख्यमंत्री विलासराव देशमुख विलचित झाले आहेत.

close