आदिवासी विभागातील 6 फाईल जप्त करा : हायकोर्ट

November 1, 2012 8:23 AM0 commentsViews: 3

01 नोव्हेंबर

आदिवासी विभागातल्या भ्रष्टाचारासंदर्भातल्या 6 फाईल जप्त करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे. रजिस्ट्रार जनरलनी या फाईल्स ताब्यात घ्याव्यात असं न्यायालयाने आदेश दिले आहे. तर या प्रकरणाची चौकशी करणार्‍या सीबीआयलाही हायकोर्टानं फटकारलंय. सीबीआयनं फक्त एकाच भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी केल्याबद्दल हायकोर्टानं त्यांना फटकारलं आहे. आदिवासी कार्यकर्ते बळीराम मोतीराव यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना मुंबई हायकोर्टानं हे आदेश दिले आहे.

close