जमिनीचा मोबदला न दिल्यानं ऑफिसचं फर्निचर जप्त

November 3, 2012 12:41 PM0 commentsViews: 24

03 नोव्हेंबर

उस्मानाबादमध्ये शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला न दिल्यानं उपविभागीय अधिकार्‍यांच्या ऑफिसमधलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरून जप्तीची ही कारवाई करण्यात आली. शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्यानं शेतकरी कोर्टात गेले होते. त्यावर कोर्टाने हा निर्णय दिला. 2007 साली तुळजापूर तालुक्यातल्या शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. पण त्यांना मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे शेतकरी कोर्टात गेले. त्यावर कोर्टाने उपविभागीय अधिकार्‍यांच्या ऑफिसमधलं साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले.

close