मूल चोरी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे

October 30, 2012 5:18 PM0 commentsViews: 2

30 ऑक्टोबर

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधून झालेल्या मूल चोरी प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. आता या मुल चोरी प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. त्याचबरोबर लहान मुलं चोरी करणार्‍या टोळ्या शोधण्यासाठी आता गुप्तचर संघटनेचीही मदत घेतली जाणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलीय. एवढंच नाही तर हायकोर्टाने दिलेले निर्देश न पाळणार्‍या हॉस्पिटल्सवर आरोग्य विभाग कारवाई करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय.

close