कारखानदार नेत्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी -रघुनाथदादा पाटील

November 2, 2012 12:54 PM0 commentsViews: 82

02 नोव्हेंबरराज्यातल्या खासगी साखर कारखानदारांच्या संपत्तीची चौकशी करावी असं सांगत अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे यांचे कारखाने कसे ऊभे राहिले, त्यांच्याकडं इतकी संपत्ती कुठून आली याची चौकशी व्हावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केलीय. त्याचबरोबर खासदार राजू शेट्टी आणि शरद जोशींच्या ऊस दराला अर्थशास्त्र नसून ते केवळ उत्पादन खर्च मागत आहेत अशी टीका रघुनाथदादा पाटील केलीय. आणि तिन्ही शेतकरी संघटनांमध्ये एकवाक्यता नसल्याची कबुली दिलीय.

close