हिमाचलप्रदेशात उद्या विधानसभेसाठी मतदान

November 3, 2012 4:12 PM0 commentsViews: 4

03 नोव्हेंबर

हिमाचलप्रदेशमध्ये उद्या 68 जागांसाठी मतदान होतंय. भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे सत्तेसाठी मोठी चुरस आहे. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्यावर जमीन व्यवहाराचे मोठे आरोप झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप या निवडणुकीचा सामना करतंय. तर एफडीआयच्या मुद्यावरुन तिथले सफरचंद उत्पादक हे सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

close