छगन भुजबळ ‘मातोश्री’वर

November 1, 2012 1:03 PM0 commentsViews: 34

01 नोव्हेंबर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आज राज ठाकरे सपत्नीक मातोश्रीवर दाखल झाले होते त्यांच्यापाठोपाठ आता सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. बाळसाहेबांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी छगन भुजबळ मातोश्रीवर दाखल झाल्याचं सांगण्यात येतं आहे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी आता सांभाळून घ्या असं भावनिक आवाहन केल्यामुळे शिवसैनिकांचे मन हेलावून गेलं. मनसेचे अध्यक्ष राज यांनी दुसरीदिवशी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आज पुन्हा एकदा दुपारी आपल्या पत्नीसह बाळासाहेबांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे हजर होते. एकेकाळी शिवसैनिक असलेले छगन भुजबळ यांनी सर्व राजकीय मतभेद दूर ठेवून बाळासांहेबांच्या प्रकृत्तीची विचारपुस करण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले आहे. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढवले जातं आहे.

close