रुनीचा 100वा गोल

December 2, 2008 9:38 AM0 commentsViews: 2

2 डिसेंबरइंग्लंडमधली प्रीमिअर लीगमधली मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी यांच्यातली मॅच जबरदस्त चुरशीची झाली. शेवटच्या मिनिटापर्यंत रंगलेल्या मॅचमधे मँचेस्टर सिटीला पराभव पत्करावा लागला. मँचेस्टर सिटीनं मॅचच्या सुरुवातीपासूनच बचावात्मक खेळ करत युनायटेडला गोल करण्यापासून रोखलं. अखेर पहिल्या हाफच्या शेवटी मँचेस्टर सिटीचा बचाव भेदण्यात युनायटेडच्या वेन रुनीला यश आलं. त्यानं त्याच्या करियरमधला 100वा गोल करत टीमला आघाडी मिळवून दिली. आणि ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. युनायटेडनं मॅच जिंकली असली तरी या मॅचमध्ये त्यांच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला रेड कार्ड मिळाल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं.

close