आरसीएफ कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरु

November 3, 2012 4:26 PM0 commentsViews: 13

03 नोव्हेंबर

तब्बल 24 वर्षानंतर आरसीएफ कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. देशभरातील व्यावसायिक कबड्डी संघासाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जायची. या स्पर्धेसाठी 36 लाखाचं बजेट आखण्यात आलंय. येत्या 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सच्या कॉलनीत जवाहर स्टेडियमवर ही स्पर्धा रंगेल. स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत देशातील पुरुषांचे 20 तर महिलांचे 18 संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती मुंबई कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

close