खाणमाफियांचा हैदोस ;शेतकर्‍यांची पिळवणूक

November 6, 2012 11:22 AM0 commentsViews: 5

06 नोव्हेंबर

अहमदनगर : बेकायदा खाणी चालवणारे क्रशरमालक आणि कारवाईचे कागदी घोडे नाचवणारे महसूल अधिकारी यात अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकरी भरडले जात आहेत. जामखेड आणि कर्जत तालुक्यात सर्रास बेकायदेशीर दगडखाणी सुरू आहेत. त्यांच्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. उलट भाड्यानं जमीन देणार्‍या शेतकर्‍यालाच तहसीलदारांनी सव्वा कोटीच्या दंडाची नोटीस बजावली आहे. भाडं 4 लाखांचं तर दंड सव्वा कोटीचा. या कात्रेत अडकलेल्या शेतकर्‍यांना खाणमालकांकडूनही दमदाटी होतेय. यात परिसरातल्या शेतीचं प्रदूषण होतंय आणि शासनाचा महसूलही बुडतोय.

close