रणजी क्रिकेट : सचिनची दमदार सेंच्युरी

November 2, 2012 2:20 PM0 commentsViews: 3

02 नोव्हेंबररणजी क्रिकेट स्पर्धेपासून क्रिकेटच्या नव्या हंगामाला आज सुरुवात झाली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर रेल्वेविरुद्ध मुंबईनं रन्सचा डोंगर उभा केला आहे. मुंबई टीममधून खेळणार्‍या सचिन तेंडुलकरनं शानदार सेंच्युरी ठोकली. सचिननं 137 रन्स केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमधली ही त्याची 79 वी सेंच्युरी ठरली आहे. सचिनपाठोपाठ अजिंक्य रहाणेनंही सेंच्युरी केली. मुंबईने पहिल्या दिवसअखेर 4 विकेट गमावत 344 रन्स केले आहेत.

close