मध्यप्रदेशात मेधा पाटकर यांचे तुरूंगात उपोषण सुरू

November 6, 2012 11:32 AM0 commentsViews: 94

06 नोव्हेंबर

मेधा पाटकर आणि त्यांच्या 21 सहकार्‍यांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडा तुरुंगात उपोषण सुरु केलं आहे. मध्यप्रदेशातील पेंच प्रकल्पातील पाणी वळवून अदानी पावर कंपनीला देण्याच्या विरोधात मेधा पाटकर आंदोलन करीत आहेत. अण्णा हजारे यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मेधा पाटकर यांच्या अटकेविरूद्ध त्यांनी मध्य प्रदेशभवनासमोर आंदोलन सुरू केलंय. रविवारी संध्याकाळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. काल त्यांच्या जामिनावर सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान, सरकारच्या पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे 35 गावांतील 300 कुटुबीयांना फटका बसणार आहे.

close