पुण्याच्या जुन्या हद्दीचा वाद मिटता मिटेना

November 2, 2012 3:19 PM0 commentsViews: 7

02 नोव्हेंबर

पुण्याच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखडा येत्या 5 नोव्हेंबर रोजी सर्वसाधारण सभेमध्ये चर्चेला येणार आहे. मात्र या आाराखड्यावरुन सुरु असलेला वाद अजुनही मिटला नाही. शहरातील जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप करत भाजपने या आराखड्याला विरोध करणार असल्याचं जाहीर केलंय. तर यातल्या अनेक मुद्द्यांना विरोध असून आराखडा मंजूर झाला पाहिजे पण या मुद्यांना वगळून अशी भुमिका विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी घेतली आहे. या विकास आराखड्याचा अभ्यास करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आराखडा लगेचच चर्चेला आणू नये अशी मागणी काँग्रेसने केली आहे. असं असलं तरी येत्या 5 तारखेला होणार्‍या सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय मांडला जाणारच. हा आराखडा चांगला आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी विरोधासाठी विरोध करु नये अशी भूमिका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली आहे.

close