दहशतवादाचा फटका पर्यटन उद्योगावर

December 2, 2008 12:27 PM0 commentsViews: 10

2 डिसेंबर औरंगाबादशेखलाल शेख दहशतवादानं पर्यटन उद्योगाचा चेहराचं बदलून टाकला आहे. मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानं सामान्य माणूस तर हादरलाचं आहे पण त्याचबरोबर पर्यटनावर आधारित अनेक व्यवसायांवर याचा विपरित परिणाम झाला आहे. मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर औरंगाबादमधल्या पंचतारांकित हॉटेलांतील 20% बुकिंग रद्द झाली आहेत.ताजमहालाची प्रतिकृती असणारा बिबी का मकबरा पाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक औरंगाबादमध्ये येतात. मात्र मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यामुळे इथं येणा-या पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे. पण काही दिवस तरी ही स्थिती अशीच राहील असं महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सुध्दा मान्य करत आहे.एकीकडे जागतिक मंदी आणि तर दुसरीकडे हॉटेलमध्ये बुकिंग केलेल्या 20% पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केलयं. त्यामुळे आधीच आर्थिक मंदीच्या विळख्यात सापडलेल्या हॉटेल उद्योगाला या दहशतवादी हल्ल्याचा चांगलाच फटका बसला आहे. मागच्या तीन दिवसांपासून इथले हॉलिडे रिसॉर्टही ओस पडले आहेत.औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला जाणा-या जेट एअरवेजच्या दोन फ्लाईट्स कायमच्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे इथल्या पर्यटन व्यवसायाला तर धक्का बसलाच आहे पण त्याचबरोबर पर्यटन व्यवसायावर आधारित सर्व छोट्या-मोठ्या व्यवसायांवरही परिणाम होत आहे.

close