दादोजींचा पुतळा मुळ गावी देण्याचा प्रस्ताव मागे

November 2, 2012 3:27 PM0 commentsViews: 21

02 नोव्हेंबर

पुण्यातील लाल महालातला दादोजी कोंडदेव यांचा पुतळा मागिल वर्षी हटवण्यात आला होता. यानंतर हा पुतळा पु.ल.देशपांडे उद्यानात ठेवण्यात आलाय. मात्र हा पुतळा आपल्याला दिला जावा अशी मागणी दादोजी कोंडदेव यांच्या मुळ गावातल्या रहिवाशांनी केली आहे त्याबद्दल त्यांनी एक पत्र महापौरांना लिहलं आहे. महापौरांनी ते पत्र प्रशासनाला पाठवलंय. यासंबंधी आज पक्षनेत्यांच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण हा विषय न्याय प्रविष्ट असल्यानं त्यावर चर्चा कशाला असं म्हणत विषयावर चर्चा नको असं सांगत प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेतला. मात्र शिवसेना आणि भाजपनं या प्रस्तावाला जोरदार विरोधक केला आहे.

close