ऊस दराचा निर्णय साखर कारखाने भरोसे

November 1, 2012 2:58 PM0 commentsViews: 92

01 नोव्हेंबर

ऐन दिवाळीच्या तोंडावर ऊसदराबद्दल सरकारने हातवर केले आहे. ऊस दराबाबत सरकाराने दराचा निर्णय साखर कारखान्यांवर सोपवला आहे. गेल्या वर्षी 44 साखर कारखान्यांनी सरकारनं ठरवून दिलेल्या धोरणानुसार ऊसाला दर दिला नव्हता. त्यामुळे यावर्षी राज्य सरकार फक्त कुठला कारखाना एफआरपी म्हणजेच आधारभूत किंमतीपेक्षा पेक्षा कमी दर देणार नाही, यावर देखरेख ठेवणार आहे. यंदाच्या हंगामात 40 साखर कारखान्यांमध्ये ऊसाचं गाळप सुरू आहे. पण त्यातले 22 कारखाने अडचणीत आले आहेत. त्यांचं नेटवर्थ उणे झालं असून त्यांना शासकीय हमी आता मिळणार नाही.

उसाचं सरकारी गणित दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे साखरेचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे साखरेचा उतारा 10 टक्के म्हणजेच टनामागे 100 किलो साखर तयार होणार आहे

साखरेचा उत्पादन खर्च वाहतूक खर्च – 450 रुपये प्रति टनकामगारांचा पगार – 125 रुपये प्रति टनखरेदीकर + ऊस तोडणी ऍडव्हान्स – 76 रुपये प्रति टनचुना + गंधक + बारदाणा + देखभाल – 250 रुपयेव्यवस्थापकीय खर्च – 115 रुपये व्याज – 150 एफआरपीचं गणित साखरेच्या एक टक्का उतार्‍यामागे 171 रुपये इतका काढला

ऊस उत्पादक महिलेंचं आर.आर.पाटील यांच्या मातोश्रींना साकडं

ऊस उत्पादक महिला शेतकर्‍यांनी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या आईंनाच साकडं घातलं. आंदोलकांना पोलिसांकडून दिला जाणारा त्रास थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली. उसाच्या दरासाठी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. पोलीस आंदोलकांच्या घरी जाऊन महिलांना धमकावत असल्याचा आरोप या महिलांनी केलाय. त्यासाठीच शेतकरी महिलांनी अंजनीत जाऊन आर आर पाटलांच्या आई भागिरथी पाटील यांची भेट घेतली. ही मागणी आर आर पाटलांपर्यंत पोचवू असं आश्वासन त्यांच्या आईंनी शेतकरी महिलांना दिलं.

close