पालिकेच्या श्रीमंत कर्मचार्‍यांना संपत्ती जाहीर करण्याचे आदेश

November 2, 2012 3:38 PM0 commentsViews: 6

02 नोव्हेंबर

मुंबई महापालिकेनं अ आणि ब वर्ग कर्मचार्‍यांनी आपली संपत्ती जाहीर करण्याचं परिपत्रक जाहीर केलं आहे. सर्व कर्मचार्‍यांना 15 जूनपुर्वी मालमत्तेचं विवरणं जाहीर करणं बंधनकारक आहे. जे कर्मचारी हे विवरणं जाहीर करणार नाहीत त्यांचा पगार थांबवण्यात येईल अशी सक्त सुचना आयुक्त सीताराम कुंटे यांनी केली आहे. त्याचबरोबर हा तपशील महापालिकेच्या पोर्टलवर टाकणं बंधनकारक करण्यात आलंय. अ आणि ब वर्ग कर्मचार्‍यांची संख्या महापालिकेत साधारणं पन्नास हजार आहे. या सर्वांना आपल्या मालमत्तेचं विवरणं सादर करणं बंधनकारक आहे.

close