मंत्रिमंडळ विस्ताराचं गाजर दाखवलं जातंय -शरद पवार

November 5, 2012 10:15 AM0 commentsViews: 19

05 नोव्हेंबर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन आज थेट काँग्रेसवर तोफ डागली. गेल्या 2 वर्षांपासून मंत्रिमंडळ विस्ताराचं फक्त गाजर दाखवलं जातंय. मंत्रिमंडळ विस्ताराची फक्त चर्चा होते.पण त्यापुढे काही होत नाही अशा शब्दात पवारांनी काँग्रेसवर टीका केली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत दिले होते. पण पुढे काहीच होत नसल्यामुळे शरद पवरांनी आज काँग्रेसवर निशाणा साधला.

close