हाजी अली दर्ग्यात महिलांना मजारजवळ जाण्यास बंदी

November 6, 2012 1:30 PM0 commentsViews: 77

06 नोव्हेंबर

मुंबईतल्या पवित्र हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांच्या प्रवेशावर मर्यादा घातल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. हाजी अली दर्गा प्रशासनाच्या या निर्णयाला भारतीय मुस्लिम महिला आंदोलनानं विरोध केला आहे. महिला आंदोलनानं राज्य सरकार आणि अल्पसंख्याक आयोगाला पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी ऑगस्टपासूनच महिलांना हाजी अली दर्गातल्या पीर हाजी अली यांच्या मजारजवळ जायला बंदी घालण्यात आली आहे. शरिया कायद्यानुसारच ही बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. महिला संघटनेच्या म्हणण्यानुसार मुंबईतल्या 20 दर्ग्यांपैकी 7 दर्ग्यांमध्ये महिलांच्या प्रवेशाला बंदी आहे.

close