शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये खडाजंगी

November 2, 2012 4:25 PM0 commentsViews: 62

02 नोव्हेंबर

राज्यातल्या शेतकरी संघटनेच्या नेत्यांमध्ये सध्या जोरदार खडाजंगी सुरू आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी, खासदार राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील हे एकमेंकांवर खरमरीत टीका करत आहे. खासदार राजू शेट्टी तडजोड करणारे नेते आहेत अशी टीका शरद जोशींनी केली होती. त्याला राजू शेट्टींनी सडेतोड उत्तर दिलंय. मी जे काही मागतो त्यात तत्वज्ञान आणि व्यवहाराची सांगड असते. शेतकर्‍यांना जे हवंय ते मी पटवून देतो म्हणून माझ्यामागे हजारो शेतकरी येतात. माझ्यावर टीका करणार्‍या शरद जोशींनी केलेली कोणती मागणी पूर्ण झाली असा सवालही राजू शेट्टींनी केलाय. शरद जोशी आणि राजू शेट्टी यांनी एकमेकांवर शरसंधान केलेलं असतानाच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केलीय. राजू शेट्टी आणि शरद जोशी मागत असलेल्या उसाच्या दराला अर्थशास्त्र नसून ते केवळ उत्पादन खर्च मागताहेत अशी टीका रघुनाथदादांनी केलीय.

close