मुंबईत जर्मन तरूणीवर बलात्कार

November 5, 2012 10:38 AM0 commentsViews: 5

05 नोव्हेंबर

मुंबईत बांद्र्यातील पेरी क्रॉस रोड वरील एका इमारतीत राहणार्‍या परदेशी तरूणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगीही जर्मन येथील रहिवासी असून संगीत शिक्षणासाठी मुंबईत आलीय. बांद्र्यातील उच्चभ्रू वस्तीत ही तरूणी एकटीच राहत होती. रविवारी पहाटे एका अज्ञात इसमाने तिच्या फ्लॅटच्या खिडकीतून प्रवेश केला. आणि तिला शस्त्राचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्या इसमाने तिला बाथरूममध्ये कोंडून घरातील मौल्यावान वस्तू चोरी करून पोबारा झाला. याप्रकरणी पीडित तरूणीने वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेलाय. तिने दिलेल्या माहितीनुसार पोलीस अज्ञात इसमाचा शोध घेतं आहे.

close