राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांबाबत निर्णय नाही

December 2, 2008 9:52 AM0 commentsViews:

2 डिसेंबर मुंबईउपमुख्यमंत्र्यांच्या निवडीचे अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहेत. मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीत विधीमंडळ नेतेपदासाठी कोणत्याही नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नाही. मुंबईतल्या नरिमन पॉईंटमधल्या राष्ट्रवादीच्या ऑफीसमध्ये ही बैठक झाली. मात्र या बैठकीला अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी तसंच राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर होते. 69 विधानसभेचे आमदार, 23 विधानपरिषदेचे आमदार आणि 10 अपक्ष सहयोगी आमदार हे या बैठकीला उपस्थित होते. कोणत्याही नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकलं नसल्यामुळे आता नेता निवडीचे अधिकार सर्वश्री शरद पवार यांना दिल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

close