औरंगाबादमध्ये डेंग्यूचा आणखी एक बळी

November 6, 2012 2:24 PM0 commentsViews: 4

06 नोव्हेंबर

औरंगाबादमध्ये डेंग्यूनं आणखी एकाचा बळी घेतला आहे. तर शहरातील वेगवेगळया हॉस्पिटलमध्ये दीडशेहुन अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या महिनाभरापासून शहर आणि परिसरामध्ये डेंग्यूची साथ फैलावत आहे. याच दरम्यान, महापालिका आणि आरोग्य विभागाच्या वतीनं तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षामध्ये कोणत्याही उपाययोजना अमालात आली नसल्यानं डेग्यू आटोक्यात येणं अवघड झालंय. दिवसेंदिवस डेग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं चिंता व्यक्त केली जातेय. उपाययोजना म्हणून पाळण्यात येणारा कोरडा दिवस आणि धूर फवारणीही केली नसल्यानंही समस्या अधिकच तीव्र झाली आहे.

close