गडकरींच्या ‘उद्योगा’ला वैतागून महेश जेठमलानींचा राजीनामा

November 5, 2012 10:52 AM0 commentsViews: 3

05 नोव्हेंबर

भाजपचे नेते महेश जेठमलानी यांनी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींविरोधात बंड पुकारलंय. महेश जेठमलानी यांनी भाजप कार्यकारणीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गडकरींवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतरही त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीसोबत काम करणं शक्य नसल्याचं महेश जेठमलानी यांनी म्हटलं आहे. तसेच आता तरी गडकरींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जेठमलानींनी केली आहे. जेठमलानींनी राजीनामा दिल्यामुळे गडकरींचा धक्का आहे. कारण यापुढे भाजपातील नाराजांची फौज राजीनामा देऊन भाजपाला सोडचिठ्ठी देतील अशी शक्यता आहे. त्यामुळे गडकरींची दुसरी टर्म धोक्यात येऊ शकते.

close